दुसर्‍या कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्‍का, जडेजाला दुखापत | पुढारी

दुसर्‍या कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्‍का, जडेजाला दुखापत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंग्‍लंड विरुद्धच्‍या पाच सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात टीम इंडियाच्‍या फलंदाजांनी हाराकिरी केली. या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता, मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडने आश्चर्यकारक कामगिरी करत सामना जिंकला. 190 धावांनी पिछाडीवर असताना इंग्लंडने हा सामना जिंकला. या सामन्‍यात भारताचा अष्‍टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली. त्‍यामुळे तो दुसर्‍या कसोटीत खेळ्‍ण्‍याची शक्‍यता कमी असल्‍याने टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. ( Ravindra Jadeja doubtful for second Test in Vizag due to injury )

Ind Vs Eng Ravindra Jadeja :  दुसर्‍या कसाेटी सामन्‍याला जडेजा मुकणार?

हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला इंग्‍लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने धावबाद केले. यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना जडेजाला दुखापत झाल्‍याचे दिसत होते. आता स्पष्ट झाले आहे की, त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे आणि दुसऱ्या सामन्यात खेळणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. जडेजाचे धावबाद होणे हा हैदराबाद कसोटी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला होता. आता त्‍याला दुखापत झाल्‍याने तो 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये खेळवल्‍या जाणार्‍या कसोटी सामन्‍यास मुकण्‍याची चिन्‍हे आहेत.( Ravindra Jadeja doubtful for second Test in Vizag due to injury )

जडेजाच्‍या दुखापतीबाबत प्रशिक्षक द्रविड यांची स्‍पष्‍टोक्‍ती नाही

पहिल्‍या कसोटी सामन्‍यानंतर बोलताना टीम इंडियाचे मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रवींद्र जडेचा दुखापतग्रस्‍त आहे, याची माहिती दिली. तसेच याबाबत मला अजून फिजिओशी बोलण्याची संधी मिळालेली नाही. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे या चर्चेनंतर ठरेल, असे राहुल द्रविड यांनी सांगितले.

Ind Vs Eng Ravindra Jadeja : कुलदीपला संधी मिळण्‍याची शक्‍यता

रवींद्र जडेजा दुखापतग्रस्‍त आहे. दुसरी कसोटी सुरु होण्‍यास केवळ चार दिवसांचा कालावधी आहे. त्‍यामुळे जडेजा संघासोबत विशाखापट्टणमला जाणार की बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रवींद्र जडेजा खेळण्‍यास फीट नसेल तर फिरकीपटू कुलदीप यादव याला दुसऱ्या कसोटीत संधी मिळू शकते, असे मानले जात आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button