Ind vs Eng 1st Test : हैदराबाद कसोटीत इंग्लडचा २८ धावांनी विजय | पुढारी

Ind vs Eng 1st Test : हैदराबाद कसोटीत इंग्लडचा २८ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाच्‍या फलंदाजांच्‍या हाराकिरीमुळे हैदराबाद कसोटीत इंग्लडचा २८ धावांनी विजय झाला. भारताचा दुसरा डाव २०२ धावांनी संपुष्टात आला.विशेष म्‍हणजे या सामन्यात चौथ्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता, मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडने आश्चर्यकारक कामगिरी करत सामना जिंकला. 190 धावांनी पिछाडीवर असताना इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या या  विजयाचे शिल्पकार ठरले दुसऱ्या डावात १९६ धावा करणारा ऑली पोप आणि दुसऱ्या डावात सात बळी घेणारा  फिरकीपटू टॉम हार्टली.

ऑली पोप आणि टॉम हार्टली ठरले इंग्‍लंडच्‍या विजयाचे शिल्‍पकार

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या आणि 190 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 420 धावा केल्या. इंग्‍लंडच्‍या दुसर्‍या डावात ऑली पाेपने केलेली १९६ धावांची खेळी निर्णायक ठरली. इंग्‍लंडने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. चाैथ्‍या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत होता;पण इंग्‍लंडचा फिरकीपटू टॉम हार्टलेने सात विकेट घेत भारताचा विजयाचा घास हिरावला. या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, २०२ धावांवरच भारताचा दुसरा डाव आटाेपला.

दुसर्‍या डावात भारतीय फलंदाजांची हाराकिरी

इंग्‍लडने दिलेल्‍या माफक २३१ धावांचा आव्‍हानाचा पाढलाग करताना टीम इंडियाचा फलंदाज ढेपाळले. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या. अश्विन आणि भरत यांनी प्रत्येकी 28 धावा केल्या. शुभमन गिली पुन्‍हा अपयशी ठरली. रवींद्र जडेजा हा धावबाद झाला. तर आर अश्‍विनने बेजबाबदारी फटका मारण्‍याच्‍या प्रयत्‍नात आपली विकेट गमावली.

हेही वाचा :

Back to top button