राजदत्त, राम नाईक यांना पद्मभूषण, उदय देशपांडे यांना पद्मश्री | पुढारी

राजदत्त, राम नाईक यांना पद्मभूषण, उदय देशपांडे यांना पद्मश्री

नवी दिल्ली : प्रख्यात मराठी दिग्दर्शक राजदत्त, माजी राज्यपाल राम नाईक यांना यंदाचा ‘पद्मभूषण’ आणि आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना ‘पद्मश्री’ जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री वैजयंती माला, अभिनेते चिरंजीवी, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा पुरस्कार विजेत्यांत समावेश आहे.

गुरुवारी रात्री पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले. त्यात सामाजिक कार्याबाबत बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती, राम नाईक, उषा उथप यांच्यासह 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यंदाच्या पद्मश्री पुरस्कारांत देशातील पहिल्या महिला माहूत पार्वती बरुआ, आदीवासी पर्यावरणतज्ज्ञा चामी मुर्मू, मिझोरामच्या सामाजिक कार्यकर्त्या संगथनकिमा, अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमींवर उपचार करणार्‍या प्लास्टिक सर्जन प्रेमा धनराज, आंतरराष्ट्रीय किर्तीचे मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांचा समावेश आहे. देशपांडे यांनी आतापर्यंत 50 देशांतील 5 हजारांहून अधिक लोकांना मल्लखांबाचे प्रशिक्षण देत हा भारतीय क्रीडा प्रकार जगभर पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

पद्मविभूषण पुरस्कार

व्यंकय्या नायडू (सार्वजनिक जीवन), बिंदेश्वर पाठक (सामाजिक कार्य), वैजयंतीमाला (कला), चिरंजीवी (कला), पद्मा सुब्रमण्यम (कला)

पद्मभूषण पुरस्कार

राम नाईक (सार्वजनिक जीवन), राजदत्त (कला), फातिमा बीवी (सार्वजनिक जीवन), होरमसजी कामा (साहित्य, शिक्षण), मिथुन चक्रवर्ती (कला), सीताराम जिंदाल (व्यापार व उद्योग), याँग लिउ (व्यापार व उद्योग), अश्विन मेहता (आरोग्य), सत्यब्रत मुखर्जी (सार्वजनिक जीवन), तेजस पटेल (आरोग्य), ओलांचेरी राजगोपाल (सार्वजनिक जीवन), तोगदान रिन्पोचे (अध्यात्म), प्यारेलाल शर्मा (कला), चंद्रशेखर ठाकूर (आरोग्य), उषा उथप (कला), विजयकांत (कला), कुंदन व्यास (साहित्य आणि शिक्षण).

पद्मश्री पुरस्कार

प्रेमा धनराज (प्लास्टिक सर्जन), उदय देशपांडे (पारंपरिक क्रीडा), पार्वती बरुआ (पशू संवर्धन, जगेश्वर यादव (आदिवासी कल्याण), चामी मुर्मू (पर्यावरण), गुरविंदर सिंग (सामाजिक कार्य), सत्यनारायण बलेरी (कृषी), दुखू मांझी (वृक्षसंवर्धन), के. चेल्लामल (सेंद्रिय शेती), संगथनकिमा (सामाजिक कार्य), हेमचंद मांझी (पारंपरिक औषधी), यानुंग जामोह (औषधी वनस्पती), सोमण्ण (आदिवासी विकास), सर्वेश्वर बसुमतरी (आदीवासी), याझ्दी इटालिया (सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ), शांती देवी पासवान आणि शिवन पासवान (चित्रकार), रतन कहार (लोकसंगीत), अशोककुमार बिस्वास (टिकुली चित्रकार), बालकृष्णन विटील (कथकली), वमा माहेश्वरी (हरीकथा), गोपीनाथ स्वैन (भजन गायन), स्मृती चकमा (विणकर), ओमप्रकाश शर्मा (माछ नाट्य कलावंत), नारायणन ईपी (लोकतृत्य), भागवत पधान (लोकनृत्य), सनादन रुद्रपाल (शिल्पकला), भद्रप्पन (लोकनृत्य), जॉर्डन लेप्चा (लेप्चा कलावंत), मछिहान सासा (मृदकला), गड्डम समैय्या (नाट्यकला), जानकीलाल (बहुरुपी कला), दासरी कोंडप्पा (वीणा वादन), बाबुराम यादव (पितळी कलाकारी), नेपालचंद्र सूत्रधार (छाऊ मुखवटा कला).

Back to top button