प्रभू रामचंद्र सुशासनाचे प्रतीक : पंतप्रधान मोदी | पुढारी

प्रभू रामचंद्र सुशासनाचे प्रतीक : पंतप्रधान मोदी

अमरावती; वृत्तसंस्था : प्रभू रामचंद्र हे सुशासनाचे प्रतीक आहेत. रामराज्याचे विचार हीच खरी लोकशाही आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

आंध्र प्रदेशातील अमरावती येथील सीमा शुल्क, नार्कोटिक्स आणि अप्रत्यक्ष कर कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आज देशात राममय वातावरण झाले आहे. प्रभू श्रीराम यांचे जीवनचरित्र विशाल आहे. प्रभू रामचंद्र स्फूर्ती आणि प्रेरणास्थान आहे. सामाजिक स्तरावर श्रीरामाच्या विचारांचे आचरण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button