Girish Mahajan : ‘संजय राऊत यांना व्हर्बल डायरियाची लागण’; गिरीश महाजन यांचा खोचक टोला | पुढारी

Girish Mahajan : 'संजय राऊत यांना व्हर्बल डायरियाची लागण'; गिरीश महाजन यांचा खोचक टोला

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि. २७) धुळ्यात खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांना व्हर्बल डायरिया झाल्याचा खोचक टोला त्यांनी धुळ्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी लगावला आहे.

धुळे येथील अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन हे आले होते. यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या टीके संदर्भात त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. इतिहासाशी भाजपचा संबंध नसल्याच्या संजय राऊत यांच्या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांवर निशाणा साधला.

महात्मा गांधींना काय उद्धव ठाकरे यांनी घडवले की, संजय रावतांनी घडवले आहे. संजय राऊत यांना व्हरबल डायरीया झाल्या असल्यासारखं ते सकाळी उठून बडबड करीत असतात. काल देखील राम मंदिराचा उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले नाही, यावरून संजय राऊत यांची बडबड सुरू होती. त्यांचा पक्ष तरी त्यांचा राहिला आहे का, आठ-दहा आमदार त्यांच्याकडे उरले आहेत, अशा आठ-दहा आमदार असलेल्यांना तिथे बोलावले तर तेथे जागाच उरणार नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांना केंद्र सरकारतर्फे आमंत्रण देण्यात आले नसल्याची मत व्यक्त करत, संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीवर निशाणा

वंचित बहुजन आघाडीच्या संभाजीनगर येथील बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या प्रत्येकी 12 जागा वाटपा संदर्भात सुरू असलेल्या चर्चावरून मंत्री गिरीश महाजन यांनी या चारही पक्षांना माझ्या शुभेच्छा असून त्यांनी त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्मुला तयार करून निवडणूक लढवावी. जिंकून दाखवावी असे म्हणत विरोधकांच्या सुरू असलेल्या बैठकांवर निशाणा साधला आहे.

आमदार निलेश लंके यांच्या वक्तव्यावर मत

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी धुळे शहर विधानसभेच्या जागेसाठी आपला उमेदवार देणार असल्याची तयारी दाखवल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात जागा वाटपाबाबत तीनही पक्षाचे प्रमुख दिल्लीतील हाय कमांड समोर बसतील, व त्यानंतरच जागा वाटपाचा निर्णय होईल असे म्हणत लंके यांचा धुळे शहर विधानसभेच्या जागेचा दाव्यावर बोलताना मत व्यक्त केल आहे.

पुणे जिल्हा नियोजन सदस्यांनी अजित पवार यांच्या निर्णयाला भाजप व शिंदे गटातर्फे झालेल्या विरोधावर मंत्री गिरीश महाजन यांनी केले मत व्यक्त लोकसभा 2024 च्या निवडणुकीदरम्यान जनता शंभर टक्के मत भाजप व मित्र पक्षांना देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणार असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केल आहे.

पुणे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवार यांना आठशे कोटींच्या कामासंदर्भात भाजप व शिंदे गटातर्फेचे विरोध करण्यात आला असल्यावर विचारणा केली असता, मंत्री गिरीश महाजन यांनी आम्हा तीनही पक्षांमध्ये एक मत असून आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही, परंतु एखादा गोष्टीवरून मत मतांतर झाल असेल परंतु 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही तिघही एकत्र आहोत असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button