South Korea : केवळ ९० सेकंदांत प्रवेश परीक्षा संपवल्याने सरकारवर खटला | पुढारी

South Korea : केवळ ९० सेकंदांत प्रवेश परीक्षा संपवल्याने सरकारवर खटला

सेऊल; वृत्तसंस्था : दक्षिण कोरियात एका महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा केवळ 90 सेकंदांच्या आत संपवल्याने विद्यार्थ्यांनी सरकारवर खटला दाखल केल्याची घटना समोर आली आहे. याला सरकारच जबाबदार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. सरकारवर केलेला विद्यार्थ्यांचा आरोप सिद्ध झाल्यास आणि त्याच्या जबाबदारीचा ठपका कोर्टाने सरकारवर ठेवल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला 20 लाख वॉन म्हणजे, 12 लाख 77 हजार रुपये सरकारला द्यावे लागतील. ही रक्कम एका विद्यार्थ्याची वर्षभराच्या ट्यूशन फीबरोबर आहे.

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, हा सरकारचा बेजाबदारपणा आहे. कारण, याचे नुकसान आम्हाला भोगावे लागेल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या चुकीचा फटका अन्य विद्यार्थ्यांनाही बसू शकतो, असे खटला दाखल केलेल्या वकिलांचे म्हणणे आहे. दक्षिण कोरियात महाविद्यालयाची अ‍ॅडमिशन घेण्याची प्रक्रिया खूपच कठीण आहे. त्यासाठी अवघड प्रवेश परीक्षा द्यावी लागते. स्थानिक भाषेत या परीक्षेला सुनेऊंग म्हटले जाते.

Back to top button