केरळमधील कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ, सर्व राज्‍यांना सतर्कतेचे आदेश | पुढारी

केरळमधील कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ, सर्व राज्‍यांना सतर्कतेचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशात मागील २४ तासांमध्‍ये 358 नव्या कोरोना रुग्‍णांची नोंद झाली आहे. यातील ३०० हून अधिक रुग्‍ण हे केरळ राज्‍यातील आहेत. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २६६९ इतकी आहे. असे केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने म्‍हटले आहे. संसर्गाची नोंद झाली आहे. यामध्‍ये केरळमध्ये प्रथम आढळलेल्या कोरोनाच्‍या सब-व्हेरियंट JN.1 च्या वाढीदरम्यान प्रकरणांमध्ये वाढ झाल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. मागील २४ तासात केरळमधील तीन रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याचेही आरोग्‍य मंत्रालयाने म्‍हटले आहे. दरम्‍यान, कोरोनाच्‍या वाढत्‍या रुग्‍ण संख्‍येच्‍या पार्‍श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्‍यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. (Covid JN.1 cases)

Covid JN.1 cases : केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवियांनी घेतली बैठक

वाढत्‍या कोरोना रुग्‍णाच्‍या पार्‍श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कोरोनाच्‍या नवा सब-व्हेरियंट JN.1 च्‍या वाढत्‍या रुग्‍ण संख्‍येवरुन राज्‍यांना सतर्क राहण्‍याची सूचना केली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी बुधवारी सांगितले होते की, देशभरातून नवीन कोरोनाव्हायरस प्रकार JN.1 चे 21 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. उपलब्ध उपचार प्रभावी आहेत, संसर्ग सौम्य आहे आणि सर्व विषाणू बदलतात, त्‍यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये मात्र त्‍यांनी सतर्क राहणे आवश्‍यक आहे.
देशातील कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना पश्चिम बंगाल आरोग्य विभाग केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार इन्फ्लूएंझा सारखी आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) प्रकरणांवर देखरेख ठेवण्‍यात आली आहे.

Back to top button