कोल्हापूर : वरपे यांनी क्षीरसागर यांच्या दरवाजावर लाथा मारल्याने वाद | पुढारी

कोल्हापूर : वरपे यांनी क्षीरसागर यांच्या दरवाजावर लाथा मारल्याने वाद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे 8 डिसेंबरला रात्री जेवण संपल्यानंतर सर्व आवरत असताना राजेंद्र वरपे यांनी जेवण करणार्‍या महिलांना शिवीगाळ केली. माझ्या मुलाला टेरेसवरून फेकून देण्याची धमकी दिली. त्यानंतर खाली जाऊन क्षीरसागर यांच्या घराच्या बंद दरवाजावर लाथा मारल्या. क्षीरसागर कुटुंबीयांनी त्याला प्रत्युत्तर दिले, अशी माहिती केटरर्स सीमा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाद घालायला प्रवृत्त करून केले सीसीटीव्हीत चित्रीकरण

क्षीरसागर यांच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येतात. त्यांच्यासाठी महिन्यातून कधीतरी टेरेसवर जेवण केले जाते. 8 डिसेंबरलाही जेवण होते. दारूची पार्टी अशी चुकीची माहिती दिली जात आहे. वरपे टेरेसवर आले. त्यांनी थेट महिलांना अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. माझा मुलगा विचारायला गेल्यावर त्याच्या अंगावर जाऊन टेरेसवरून फेकण्याची धमकी दिली. मला धक्काबुक्की केली.

आमच्याबरोबर वाद घातल्यानंतर खालच्या मजल्यावरील क्षीरसागर यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारल्या. आम्ही क्षीरसागर यांना वरपे वारंवार आम्हाला शिवीगाळ करत असल्याचे सांगितल्यानंतर विचारायला गेलेल्या क्षीरसागर कुटुंबीयांना वाद घालायला लावून त्यांच्याच घरातून लावलेल्या सीसी टीव्हीतून चित्रीकरण केले. केवळ राजकीय द्वेषातून आणि पूर्ववैमनस्यातून वरपे कुटुंबीय त्रास देत आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

Back to top button