पन्नूच्या हत्येसाठी एक लाख डॉलर्सची सुपारी | पुढारी

पन्नूच्या हत्येसाठी एक लाख डॉलर्सची सुपारी

नवी दिल्ली : निखिल गुप्ता यांना खलिस्तानवादी गुरुपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येच्या कट रचल्याप्रकरणी निखिल गुप्ता यांना एक लाख डॉलर्सची सुपारी दिल्याचा दावा अमेरिकन तपास यंत्रणांनी केला आहे. गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर अमेरिकेने यासंदर्भात भारतीय तपास यंत्रणांना माहिती दिली आहे.

52 वर्षीय गुप्ता यांना काँट्रॅक्ट किलिंगअंतर्गत पन्नूची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. गुप्ता यांना 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, अशी माहिती दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याचे अटर्नी मॅथ्यू जी ऑलसेन यांनी दिली. पन्नू याच्या हत्येच्या कटात गुप्ता याच्यासह कॅनडा, पाकिस्तानसह अमेरिकेतील दोन नागरिकांचा सहभाग असल्याचेही उघड झाले आहे.

परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुप्ता याच्यावरील गुन्हा हा चिंताजनक प्रकार असल्याची प्रतिक्रिया दिली. ही घटना भारतीय धोरणाविरोधात असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुप्ता कोण

एफबीआय या अमेरिकन तपास यंत्रणेनुसार, गुप्ता हे आयबी या भारतीय तपास यंत्रणेचे अधिकारी आहेत. कॅनडा, पाकिस्तान आणि अमेरिकेतील नागरिकांच्या मदतीने त्यांनी पन्नू यांच्या हत्येचा कट आखला होता. पन्नू याला गोळ्या घालून, विषप्रयोग करून अथवा कार बॅाम्बस्फोट घडवून ठार मारण्याचा कट रचल्याचा गुप्ता यांच्यावर आरोप आहे.

Back to top button