SA vs AUS 2nd Semi-Final : सेमीफायनलसाठी ऑस्‍ट्रेलिया-द. आफ्रिका सज्‍ज, ‘या’ दिग्गजांचे होणार पुनरागमन | पुढारी

SA vs AUS 2nd Semi-Final : सेमीफायनलसाठी ऑस्‍ट्रेलिया-द. आफ्रिका सज्‍ज, 'या' दिग्गजांचे होणार पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात  एकदिवसीय विश्वचषक स्‍पर्धेतील दुसरा उपांत्य सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाने आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती, ते या सामन्यात पुनरागमन करण्‍यार आहेत. दोन्‍ही संघ आपल्‍या दिग्‍गज खेळाडूंसह मैदानात उतरतील.

SA vs AUS 2nd Semi-Final : स्टार्क-मॅक्सवेलचे होणार पुनरागमन

विश्‍वचषक स्‍पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल याला विश्रांती दिली होती. त्‍याने अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांची संस्मरणीय खेळी केली होती. मॅक्सवेल संघात परतला तर मार्नस लॅबुशेन किंवा मार्कस स्टॉइनिस यापैकी एकाला बाहेर बसावे लागण्‍याची शक्‍यता आहे. तसेच मिचेल स्टार्कचे संघात पुनरागमनही निश्चित मानले जात आहे. मात्र, स्टार्कच्या फिटनेसबाबत काही शंका आहे. स्टार्क प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला तर शॉन अॅबॉट याला राखीव खेळाडूंसोबत बसावे लागेल.

SA vs AUS 2nd Semi-Final : बावुमाच्‍या फिटनेसवर चर्चा

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाच्या फिटनेसवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, बावुमाने कोलता येथील सराव सत्रात भाग घेतला, त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असे मानले जात आहे. संघाने आपला मुख्य वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनला अफगाणिस्तानविरुद्ध विश्रांती दिली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अकरा संघात परतेल. जेन्सेन संघात परतल्यावर अँडिले फेहलुकवायोला बाहेर बसावे लागेल अशी शक्‍यता आहे.

दक्षिण आफ्रिका संभाव्‍य प्लेइंग 11: क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा, रॅसी व्हॅन डर डुसेन, अॅडम मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

ऑस्ट्रेलिया संभाव्‍य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.

हेही वाचा :

Back to top button