AUS vs PAK : डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन शाह आफ्रिदी मैदानात एकमेकाला भिडले, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

AUS vs PAK : डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन शाह आफ्रिदी मैदानात एकमेकाला भिडले, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी  दोघे मैदानावर एकमेकांना भिडले. एवढ्यावर न थांबता दोन्ही खेळाडू सतत एकमेकांकडे रागाने बघू लागले. (AUS vs PAK)

सध्या ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात लाहोरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावरील तापमान चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी मैदानावर एकमेकांना भिडले.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यात चुरस वाढली होती. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजी करत असताना डेव्हिड वॉर्नरने त्याच्या चेंडूचा बचाव केला. फॉलो-थ्रू पूर्ण केल्यानंतर शाहीन आफ्रिदी थेट वॉर्नर समोर पोहोचला यामुळे दोन्ही खेळीडू एकमेकांच्या जवळ आले.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

बाऊन्सर टाकल्यानंतर आफ्रिदी थेट वॉर्नरकडे गेला आणि त्याच्याकडे रागाने बघू लागला, यानंतर वॉर्नरनेही आफ्रिदीला नजर दाखवली. दोघेही एकमेकांकडे रागाने बघितले. यावेळी दोघांचा फोटो व्हायरल झाला. डेव्हिड वॉर्नर कमी उंचीचा आणि शाहीन शाह आफ्रिदी उंच असल्याने हे चित्र अधिकच रंजक दिसते. खेळाडूंची ही आक्रमक शैली चाहत्यांना खूप आवडली.

२४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात

२४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या मायभूमीत आला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने १९९८ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन टीम २०२२ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने अनिर्णित राहिले. आता हा तिसरा सामना अनिर्णीत राहणार की, शेवट्च्या सामन्यात मालिकेचा निकाल लागणार हे पहावे लागणार. शेवटच्या कसोटी सामन्यात अजून २ दिवसांचा खेळ बाकी आहे.

सामन्यात ऑस्ट्रेलिया आघडीवर

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ११ धावा केल्या आहेत. यात डेव्हिड वॉर्नर ४ आणि उस्मान ख्वाजा ७ धावांवर नाबाद आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर १३४ धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचा पहिला डाव २६८ धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ४ बळी घेतले, तर कर्णधार पॅट कमिन्सने ५ बळी घेत पाकिस्तानी फलंदाजांचे कंबरडे मोडले. पहिल्या डावात पाकिस्तानच्या शेवटच्या ६ गडी केवळ २० धावांच्या अंतराने पडल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३९१ धावा केल्या होत्या.

Back to top button