सावधान! आता पुण्यातही झिकाची एन्ट्री | पुढारी

सावधान! आता पुण्यातही झिकाची एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वात घातक समजला जाणारा झिका विषाणू आता पुण्यातही प्रेवश करता झाला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.  पुण्यातील येरवडा परिसरात 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला झिका या आजाराची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. या घटनेची दखल घेत आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना झिका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिलेला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तिच्या रक्ताचा नमुना 10 नोव्हेम्बर ला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही) ला पाठवला होता.त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी त्या महिलेचा अहवाल झिका पॉझिटीव्ह आला. ती 15 ऑक्टोबरला केरळला गेली होती, अशी माहिती समोर आली आहे, त्यामुळे तिला झिकाची बाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या दरम्यान दि. 15 नोव्हेंबर रोजी साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रताप सिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिक नगर येरवडा येथे प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व तब्येतीची काळजी घ्या म्हणुन सांगितले. पुढे त्यांनी पुणे महानगरपालिका येथील कर्मचारी यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश दिले.

 येरवडा येथील एक 64 वर्षाची महिला झिका पॉझिटिव्ह आढळली. तिला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबर ला केरळ ला गेली होती, तेव्हा तिला झिका ची बाधा झाल्याची शक्यता आहे. आता तिची तब्येत स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील 5 जणांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहे, त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत.

– डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग

 

हेही वाचा

Back to top button