परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख मंजूर | पुढारी

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख मंजूर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले आहेत. इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय (GR) जारी केला आहे. (Scholarship)

शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी २०२३-२४ मध्ये ५० ओबीसी विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यातील या वर्षातील बॅचमधील ३२ तर मागील बॅचमधील २ विद्यार्थांना १२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. (Scholarship)

ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा नक्की लाभ होईल, असा विश्वास इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

 

Back to top button