मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा समाजातील गुणवंत 21 विद्यार्थ्यांसाठी परदेशी विद्यापीठांतील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. राज्य सरकारने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय (जी.आर.) जारी केला आहे.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांत शिक्षणासाठी राज्य सरकारने शिष्यवृत्ती योजना घोषित केली होती. छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) 'सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती' या योजनेंतर्गत एकूण 21 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यात पीएच.डी.साठी तिघांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे; तर पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी 18 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.