धुळे : श्री. शिव महापुराण कथास्थळी ध्वज पूजन उत्साहात, तयारीला वेग | पुढारी

धुळे : श्री. शिव महापुराण कथास्थळी ध्वज पूजन उत्साहात, तयारीला वेग

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे महानगरीत, दि.१५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान श्री.शिव महापुराण संपन्न होत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालय जवळ होणार्‍या या कथास्थळी आज ध्वज पूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. या महापुराण कथेच्या तयारीला वेग आला असुन, उपस्थितीचे आवाहन यावेळी कथा समितीने केले आहे.

धुळे महानगरीत होणार्‍या आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार, पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महा पुराणकथेस राज्यभरासह जवळच्या राज्यातील भावीक कथा श्रवणाचा लाभ घेणार आहेत. दि.१५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणार्‍या या महा कथेच्या पार्श्वभूमीवर आज ध्वज पूजनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. खा.डाॅ.सुभाष भामरे यांच्या हस्ते ध्वज पूजन तसेच बाळासाहेब भदाणे व शालिनीताई भदाणे यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले.

यावेळी स्वामीनारायण मंदिराचे कोठारी संत आनंदजीवन स्वामी, कथा समितीचे संयोजक व खा.डॉ.सुभाष भामरे, धुळे विधानसभा प्रमुख व कथा समिती संयोजक अनुप अग्रवाल, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कथा समितीचे संयोजक बाळासाहेब भदाणे, नगरसेवक व समिती संयोजक चेतन मंडोरे, माजी आमदार प्रा.शरद पाटील, माजी स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले, भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उद्योजक गोपाल केले, माजी नगरसेवक कमलाकर अहिरराव, उद्योजक विनोद मित्तल, शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख मनोज मोरे,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, डॉ.सुशिल महाजन, ललित माळी, किरण जोंधळे, नगरसेवक कैलास चौधरी, संजय वाल्हे, नगरसेविका बालीबेन मंडोरे, जि.प.सदस्या शालिनीताई भदाणे, महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी तसेच समस्त शिवभक्त, तसेच विविध सामाजिक, महिला, धार्मिक संघटना व विविध संस्थांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या श्री. महा शिवपुराण कथेच्या स्थळी या सर्व मान्यवरांच्या हस्ते विधीवत ध्वज पूजन करण्यात आले. या कथा श्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन, यावेळी उपस्थित मान्यवरांनी व कथा समिती संयोजन समितीने केले.

Back to top button