Tiger 3 ला अवघे काही दिवस बाकी; सलमान खानने घेतले इतके पैसे | पुढारी

Tiger 3 ला अवघे काही दिवस बाकी; सलमान खानने घेतले इतके पैसे

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायगर ३ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या काही दिवस आधी कॅटरिना कैफ आणि सलमान खानने त्यांच्या चाहत्यांसाठी खास खास भेट आणली होती. निर्मात्यांनी आणखी एक अफलातून प्रोमो डिजिटली लाँच (tiger 3) करून प्रेक्षकांसाठी ग्रेट भेट दिली. आता चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर टायगर ३ ची आधीच प्रचंड चर्चा होत आहे. तुम्हाला माहितीये की, या चित्रपटासाठी सलमान खानने किती रुपये घेतले आहेत. (tiger 3)

कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांच्यातील सुपर केमिस्ट्री आहे आणि त्यांचे अॅक्शन-पॅक सीक्वेन्स चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत. निर्मात्यांनी सोशल मीडिया हँडलवर ट्रेलर शेअर करत म्हटले होते-“वन मॅन आर्मी! टायगर परत आला आहे #Tiger3 रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे.

“टायगर 3” चा दुसरा प्रोमो चित्रपटाच्या कथानकाची एक झलक दाखवण्यात आली आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित “टायगर 3” नवीन प्रोमोने आणखी उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी जबरदस्त विरोधी भूमिकेत आहे. रिपोर्टनुसार, सलमान खान या चित्रपटाच्या ६० टक्के भाग घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

Back to top button