नागपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान, आज मतमोजणी | पुढारी

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान, आज मतमोजणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसह ५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकींसाठी  सरासरी  ६५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आज (दि.६)  मतमोजणी होणार आहे. मतदानाचा हक्क बजवण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
काटोल, नरखेड , सावनेर , कळमेश्वर , रामटेक , पारशिवनी , मौदा , कामठी , उमरेड , भिवापूर , कुही , नागपूर ग्रामीण,  हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायतीत निवडणुका पार पडल्या.  काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी आज (दि.६) तालुका स्तरावर होणार आहे. मतदान रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्यामुळे मतदानाची अधिकृत टक्केवारी समोर आली नाही.
हेही वाचा :

Back to top button