सांगली: आटपाडीत ग्राम पंचायतींसाठी ८३ टक्के मतदान; निंबवडेत मारामारी

सांगली: आटपाडीत ग्राम पंचायतींसाठी ८३ टक्के मतदान; निंबवडेत मारामारी

आटपाडी,  पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकींसाठी आज (दि.५)  चुरशीने मतदान झाले. १५ ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के अटीतटीने मतदान झाले. निंबवडे येथे मतदार आणण्याच्या कारणावरून मारामारी झाली. अन्यत्र किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले.

मासाळवाडी येथे सर्वाधिक मतदान झाले. निंबवडे येथे दोन्ही गटांमध्ये मतदान करण्याच्या कारणावरून मारामारी झाली. मासाळवाडी व करगणीत किरकोळ वादावादी झाली. आटपाडी तालुक्यातील १५ गावातील उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले.

तालुक्यात मतदानासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. करगणी येथे शिवसेनेच्या तानाजी पाटील गटाला भाजपच्या अमरसिंह देशमुख गटाने लढत दिली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटासोबत माजी आमदार राजेंद्र देशमुख गटाने सामना केला. राष्ट्रवादी तसेच रासपा, काँग्रेसची वेगळी आघाडी झाल्याने चुरशीने मतदान झाले. करगणी येथे मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

नेलकरंजी, मासाळवाडी, निंबवडे, चिंचाळे येथे चुरशीने मतदान झाले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

गावनिहाय मतदान पुढीलप्रमाणे : –

करगणी ८२
निंबवडे ८३
मासाळवाडी ९६
नेलकरंजी ७९
काळेवाडी ८६
पिंपरी खुर्द
आंबेवाडी ९१.३०
वाक्षेवाडी ८३
मानेवाडी ८५
कानकात्रेवाडी ८३
बनपुरी ८२
चिंचाळे ७०
विभुतवाडी ८१
मिटकी ८७
पुजारवाडी आटपाडी २७.४७
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news