Krishna river : अखेर कोयनेतून कृष्णा नदीत पाणी सोडले | पुढारी

Krishna river : अखेर कोयनेतून कृष्णा नदीत पाणी सोडले

सांगली पुढारी वृत्तसेवा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी आल्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट आज दुपारी 1:00 वा सुरू करण्यात आले आहे. (Krishna river)

Krishna river : कोयना नदीपात्रामध्ये 1050 क्युसेक्स विसर्ग 

कृष्णा नदीतून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने गेल्या आठ दिवसापासून सांगली जिल्ह्यातील नदीचे पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठासह अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सतत होत होती. जिल्ह्यातील खासदार आमदार यांचाही पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू होता मात्र पाणी सोडले जात नव्हते. त्याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली होती त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस तर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात त्यामुळे दुपारी एक वाजता पाणी सोडण्यात आले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button