Pune News : शेळगावला तीन संचालकांच्या पत्नी ग्रामपंचायतीच्या रिंगणात | पुढारी

Pune News : शेळगावला तीन संचालकांच्या पत्नी ग्रामपंचायतीच्या रिंगणात

शेळगाव : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील मोठ्या शेळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील दोन साखर कारखान्यांच्या विद्यमान संचालकांच्या पत्नी रिंगणात उतरल्या आहेत. यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड. लक्ष्मणराव शिंगाडे यांच्या पत्नी ऊर्मिला, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल जाधव यांच्या पत्नी भारती, तर दुसरे संचालक अंबादास शिंगाडे यांच्या पत्नी सुनीता या सरपंचपदासाठी निवडणुकीत असल्याने मोठी चुरस होणार आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये सागर तयाप्पा वाघमोडे, सोनाबाई दुर्गा काळे, प्रभाग चारमध्ये राजेंद्र गुलाब चवरे हे बिनविरोध विजयी झाले असून, उर्वरित 14 सदस्यपदाच्या जागेसाठी एकूण 35 उमेदवार रिंगणात आहेत

Back to top button