धाराशिव: तुळजाभवानीची दुर्गाष्टमीला महिषासुर मर्दिनी रुपात महापूजा | पुढारी

धाराशिव: तुळजाभवानीची दुर्गाष्टमीला महिषासुर मर्दिनी रुपात महापूजा

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवात आज (दि.२२) दुर्गाष्टमी दिवशी तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर ही पूजा बांधण्यात आली.

ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले, व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला. त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला. व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

तत्पूर्वी काल शनिवारी रात्री सातव्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात पितळी गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, शनिवारी व रविवारी भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button