परभणी : वरूड येथील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

परभणी : वरूड येथील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा: जिंतूर जालना महामार्गावरील रायखेडा गावाजवळ वरुड नृसिंह येथील जखमी अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा परभणी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की,जिंतूर जालना महामार्गावरील रायखेडा गावाजवळ एक अज्ञात व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला होता. दरम्यान, यावेळी संभाजीनगर येथून जिंतूरकडे येत असताना संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर यांना ही व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आली. त्यांनी तत्काळ गाडी थांबवून जखमी व्यक्तीला नागरिकांचा मदतीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून ओळख पाठविण्यात आली. ही व्यक्ती जिंतूर तालुक्यातील वरुड नृसिंह येथील रहिवासी विष्णू आश्रोबा शिंदे असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. अजमल यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा 

Back to top button