परभणी : सेलूत भाजपचे जोडे मारो आंदोलन | पुढारी

परभणी : सेलूत भाजपचे जोडे मारो आंदोलन

सेलू, पुढारी वृत्तसेवा : कंत्राटी भरतीचा निर्णय तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले होते. सदरील दिशाभूल करणारी कंत्राटी भरती रद्द करून तरुणांची फसवणूक रोखल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांचे आभार मानत क्रांती चौकात आज (दि.२१) भाजपच्यावतीने आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो अंदोलन करण्यात आले. तसेच महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष अॅड. दत्तराव कदम, अॅड. संजय लोया, अॅड.रामेश्वर शेवाळे, अशोक अंभोरे, भागवत दळवे, गनेश काटकर, अजय डासाळकर, अनिल पवार, मयूर वाघ, सुंदर गाडेकर, पंजाब पौळ, कपिल फुलारी, शिवहारी शेवाळे, रुपाली ठाकुर, संदीप बोकण, लालू खाँ पठाण, रफिक बेलदार, गणेश सवणे, अॅड.कृष्णा शेरे, अॅड. मुकुंद गजमल, जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरुळ, दगडोबा जोगदंड, बाळू काजाळे, प्रकाश शेरे, शिवाजी खेडकर, नीरज लोया, गोविंद शर्मा, राजू सोळंके, विजय काष्टे, सुनिल चव्हाण, अर्जुन चव्हाण, अजित मोगल, लक्ष्मण गायके, महेश कलालडे, अमोल भोसले, पांडू पांचाळ, सय्यद नियाझोद्दिन सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button