कोल्हापूर : इचलकरंजीत जर्मनी टोळीला सहाव्यांदा ‘मोका’ | पुढारी

कोल्हापूर : इचलकरंजीत जर्मनी टोळीला सहाव्यांदा ‘मोका’

यड्राव; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले, शिरोळ तालुक्यासह इचलकरंजी शहर परिसरातील कुख्यात जर्मनी टोळीवर सहाव्यांदा ‘मोका’ कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे पाठविला होता. त्याला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये 16 जणांचा समावेश आहे. त्यापैकी एक बालक आहे. तर या गुन्ह्यातील मास्टरमाईंड महेश माळी हा अद्यापही फरार आहे. या टोळी विरोधात दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, चोरी, दुखापत यासारखे आजपर्यंत 27 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. एकाच टोळीवर मोकासारखी गंभीर स्वरूपाची सहाव्यांदा झालेली कारवाई ही महाराष्ट्रात पहिलीच आहे.

शहापूर येथील व्यावसायिक सरदार मुजावर यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चेन, सोन्याचे ब्रेसलेट तसेच हातातील घड्याळ असा सुमारे 11 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता. तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून पोलीसात तक्रार दिल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याबाबत मुजावर यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार कुख्यात जर्मनी गँग या संघटित गुन्हेगारी संघटनेविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या होत्या. त्याला आज मंजुरी देण्यात आली.

यामध्ये टोळीप्रमुख आनंदा शेखर जाधव उर्फ आनंद्या जर्मनी, रुप्या उर्फ रुपेश पंडीत नरवाडे,  मेहबुब इस्माईल उकली, सिद्धया उर्फ सिध्दु जटाप्पा पुजारी, अरबाझ महमदहनिफ शेख, आशादुल्ला हारुण जमादार, महंमदकैफ आरीफ इनामदार, गौरव शरद मर्दे, रोहन प्रकाश मांडे, आदित्य राजेंद्र शेटके, राज उर्फ चिन्या संजय सूर्यवंशी,  अक्षय अशोक घाडगे, रोहन सुरेश गेजगे, अक्षय अशोक कोंडुगळे, महेश आप्पासो माळी व विधी संघर्षित बालक यांचा समावेश आहे.

Back to top button