Google ने भारतातील २० लाख YouTube व्हिडिओ हटवले, काय आहे कारण? | पुढारी

Google ने भारतातील २० लाख YouTube व्हिडिओ हटवले, काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन : गुगलने (Google) भारतातील सुमारे २० लाख यूट्यूब (YouTube videos) व्हिडिओ एप्रिल ते जून २०२३ दरम्यान काढून टाकले आहेत. त्यांच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई केल्याचे गुगलने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

गुगलच्या म्हणण्यानुसार, एप्रिल आणि जून २०२३ दरम्यान त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतातील सुमारे २० लाख व्हिडिओ काढून टाकले आहेत. यापूर्वी गुगलने त्यांच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान भारतातील त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून १९ लाख व्हिडिओ हटवले होते. जागतिक स्तरावर व्हिडिओ-स्ट्रीमिंग दिग्गज यूट्यूबवरून याच कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ६४ लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले होते.

दरम्यान, Google Pay वर आम्ही काही संशयास्पद व्यवहारांबद्दल लोकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेच्या माध्यमातून तत्त्काळ सतर्क केले. आम्ही फसवणुकीचे प्रकार त्वरित रोखले आहे. परिणामी, गेल्या वर्षी केवळ Google Pay ने १२ हजार कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे रोखले असल्याचेही गुगलने सांगितले.

Google ने गुरुवारी नवी दिल्लीतील वार्षिक ‘Google for India’ या फ्लॅगशिप इव्हेंटमध्ये AI- संचालित लाँच, भागीदारी आणि Google च्या मुख्य उत्पादनांमध्ये जसे की सर्च, GPay आणि Google क्लाउडमधील गुंतवणूकीची घोषणा केली.

हे ही वाचा :

Back to top button