Google Flights : स्‍वस्‍त विमान प्रवास कसा कराल? Google ने लाँच केले नवीन फीचर | पुढारी

Google Flights : स्‍वस्‍त विमान प्रवास कसा कराल? Google ने लाँच केले नवीन फीचर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सर्वात महागड प्रवास अशी विमान प्रवासाची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांमध्‍ये देशांतर्गत आणि विदेशात विमान प्रवासामध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यटनापासून उद्‍योगापर्यंत अनेक कारणांमुळे हा प्रवास आता अनिवार्य झाला आहे. मात्र स्‍वस्‍त विमान प्रवास करण्‍यास सर्वांचेच प्राधान्‍य असते. याचा विचार करुन Google ने नवीन फीचर लाँच केले आहे. हे फीचर विमान प्रवास करण्‍यास इच्‍छूक असणार्‍यांना सवलतीमध्‍ये तिकिट बुक करण्यास मदत करते.

विमान तिकीट खरेदी करण्‍यासाठी २८ ऑगस्‍ट रोजी Google Flights हे फिचर लाँच केले आहे. गुगलने ब्लॉग पोस्टद्वारे अधिकृतपणे घोषित केले की, विमान तिकिट दराचे पैशांची बचत करणे हे या फिचरचे वैशिष्ट्य आहे. प्रवाशांना फ्लाइट बुकिंगसाठी सर्वात स्‍वस्‍त बजेटचा अनुकूल कालावधीसाठी ते मार्गदर्शन करते. प्रवाशांना तिकिट बुक करण्यासाठी किमती सामान्यत: सर्वात कमी केव्हा असतील याची माहिती हे फिचर देईल, असेही Google ने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रवाशांसाठी आज असलेले भाडे प्रवासापूर्वी कमी होणार नाही. तुम्ही यापैकी एक फ्लाइट बुक करता तेव्हा आम्ही त्याचे निरीक्षण करू टेकऑफच्या आधी दररोज किंमत आणि किंमत कमी झाल्यास आम्ही प्रवाशांना Google Pay द्वारे फरक परत करू, असेही कंपनीने म्‍हटले आहे.

प्रवासापूर्वी ७१ दिवस आधी सरासरी तिकिट दर कमी

Google च्या मते दरवर्षी डिसेंबरच्या मध्यापासून सुरू होणाऱ्या सहलींसाठी ऑक्टोबर महिन्‍यापासून बुकिंग सुरु होण्‍याची शक्‍यता असते. विमान प्रवासापूर्वी ७१ दिवस आधी तिकिटाचे दर सरासरी किमती सर्वात कमी असतात. मात्र 2022 च्या इनसाइट्समधील एक मोठा बदल आढळून आले की, प्रवाशाच्‍या फक्त 22 दिवस आधी सरासरी किमती सर्वात कमी होत्या. आणि सामान्य कमी किमतीची श्रेणी आता टेकऑफच्या ५४-७८ दिवस आधी आहे, असेही Google ने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button