केवळ औषधानेच बरा झाला तिसर्‍या टप्यातील कर्करोग! | पुढारी

केवळ औषधानेच बरा झाला तिसर्‍या टप्यातील कर्करोग!

लंडन : बि-टनमधील वेल्स येथील रहिवासी महिलेबाबत एक असा चमत्कार घडला, ज्यावर विश्वास ठेवणे तिच्यासाठीही कठीण ठरते आहे. कॅरी डाऊनी, असे या 42 वर्षीय महिलेचे नाव असून ती आतड्याच्या कर्करोगाशी झुंजत होती. एरवी थर्ड स्टेजपर्यंत एखादा असा आजार पसरतो, तोवर केमोथेरपीचे उपचार केले गेलेले असतात. पण, कॅरीला केवळ सहा महिने औषधे घेऊनच या दुर्धर आजारावर मात करणे शक्य झाले आहे.

कॅरी डाऊनीला कर्करोग झाल्याचे निदान वर्षभरापूर्वी केले गेले होते. तिला पहिल्या सहा महिन्यांपर्यंत डोस्टारलिमेंब इन्फ्यूजन दिले गेले. त्यानंतर चाचणी केली गेली आणि तिचा रिपोर्ट नॉर्मल आला. डोस्टारलिमेंब इम्युनोथेरपी कर्करोग समूळ नष्ट करण्यासाठी प्रणालीची मदत करते.

कॅरीला हर्निया प्रत्यारोपणानंतर वेदना होत होत्या. त्यामुळे चाचणी घेतली गेली आणि त्यात तिला कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. सिंगल्टन हॉस्पिटलमधील डॉ. क्रेग बेरिंग्टन यांनी तिला डोस्टारलिमेंब इन्फ्यूजन घेण्याचा सल्ला दिला होता. वाढते वय, रेड मीट, फायबरची कमतरता, प्रोसेस मीट, आतड्याचे विकार, धुम-पान व मद्यपान यामुळे आतड्याचा कर्करोग होऊ शकतो, असे यावेळी सांगण्यात आले.

Back to top button