भारतात खरोखरच येणार हवेत उडणाऱ्या बसेस’; गडकरींनी दिली माहिती | पुढारी

भारतात खरोखरच येणार हवेत उडणाऱ्या बसेस’; गडकरींनी दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले अनेक दिवस हवेत उड्डाण घेऊ शकणाऱ्या बसची चर्चा होती. लवकरच या बस आता भारतात पहायला मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एक्स पोस्टनंतर ही स्काय बस चर्चेत आली आहे.

प्राग दौऱ्यावरून भारतात परतत असताना गडकरी हे शारजाहला भेट दिली. दरम्यान, यूएईच्या शारजाह येथील YouSky तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी या चर्चेतील स्काय बसची चाचणी घेतली. गडकरी यांच्या या आजच्या पोस्टनंतर आता ही बस लवकरच भारतात पहायला मिळणार याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा स्काय बसवर टेस्ट राइड घेतल्याचा अनुभव शेअर केला. uSky टेक्नॉलॉजीने स्काय बस सोल्यूशन विकसित केले आहे आणि या मोबिलिटी सेवा भारतात आणण्यासाठी iSky मोबिलिटीने uSky सोबत करार केला आहे.

स्काय बस हे तंत्रज्ञान बेंगळुरू, पुणे, नागपूर आणि दिल्ली यांसारख्या भारतीय शहरांमध्ये प्रभावी ठरेल आणि ते लवकरच भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Back to top button