MLC Election : सोलापूर जिल्ह्याची विधान परिषद निवडणूक लांबणीवर | पुढारी

MLC Election : सोलापूर जिल्ह्याची विधान परिषद निवडणूक लांबणीवर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : MLC Election : जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या एकुण संस्थापैकी 75 टक्के पेक्षा कमी स्थानिक स्वराज्य संस्थाचे कार्यकारी मंडळ कार्यरत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या एका जागेसाठीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या आठ जागांची मुदत येत्या डिसेंबर अखेर संपणार होती. त्यापैकी पाच जिल्ह्यातील सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तरी सोलापूर आणि अहमदनगर येथील पात्र संख्या 75 टक्के पेक्षा अधिक नसल्याने या दोन जिल्ह्यातील निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या 10 डिसेंबरला मतदार होणार आहे. याची अधिसूचना 16 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर असणार आहे. तर अर्ज माघार घेण्यासाठी 26 नोव्हेंबर पर्यत मुदत असणार आहे. तर यासाठी येत्या 10 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर याची मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे. तर ही निवडणूक येत्या 16 डिसेंबर पूर्वी पार पाडण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे.

जिल्ह्यातील किमान 75 टक्के मतदार यासाठी पात्र असावेत किंवा 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य मंडळ कार्यरत असावे असे संकेत निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात 11 नगरपरिषदा आणि नगरपालिका होत्या त्यापैकी मोहोळ, माढा आणि माळाशिरस या तीन नगरपरिषदांची मुदत संपलेली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कार्यरत असलेले जवळपास 51 सदस्यांचे सदस्यत्व संपुष्ठात आले आहे. त्या ठिकाणी प्रशासक आहे. त्यामुळे पूर्वीच्या नगरपरिषदा गृहीत धरल्या असत्या तर सोलापूर जिल्हा या निवडणूकीसाठी पात्र ठरला असता मात्र निवडणूक आयोगाने जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या आणि काही दिवसापूर्वी नव्याने घोषित झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायती गृहीत धरल्या असाव्यात त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या महाळुंग श्रीपुर, माळशिरस, नातेपुते, अकलूज, वैराग आणि अनगर या नव्याने सहा नगरपंचायती स्थापन झाल्या आहेत.त्यांच्या निवडणूका अद्याप झालेल्या नाहीत त्यामुळे या ठिकाणी कार्यकारी मंडळ अस्तित्वात नाही. तर यापूर्वी मोहोळ, माढा आणि माळाशिरस या नगरपालिकांची मुदत संपलेली आहे.त्यामुळे या नगरपालिका आणि पंचायतीच्या सदस्याचे सदस्यत्व संपुष्ठात आलेले आहे.त्यामुळे अपात्र सदस्यांची संख्या अपसूकच वाढली आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीपासून जिल्ह्याला आता वंचित रहावे लागले आहे. भाजपासाठी ही निवडणूक सोपी मानली जात होती. मात्र ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आता महाविकास आघाडीचा या निवडणूकीसाठी आत्मविश्वास बळावला आहे.

यामुळे जिल्ह्याला निवडणुकीपासून रहावे लागले वंचित…

जिल्ह्यातील पूर्वीच्या तीन नगरपरिषदांच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला आहे तर जिल्ह्यात नव्याने सहा नगरपंचायती स्थापन झाल्या आहेत.त्यामुळे या नऊ नगरपालिका आणि पंचायतीमुळे अपात्र सदस्यांची संख्या वाढली आहे.त्यामुळे राज्यातील विधान परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 1 जागेसाठी घेण्यात येणार्‍या निवडणूक प्रक्रियेतून सेालापूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. तर पाच जिल्ह्यातील सहा जागांचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे.

त्यामुळे अपात्र सदस्यांची संख्या वाढली..

जिल्ह्यातील यापूर्वी पात्र सदस्यांची संख्या 410 होती.त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषदांचे सदस्य होते. त्यापैकी काही कारणास्त 3 ते 4 सदस्य अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा या निवडणूकीसाठी पात्र ठरला असता मात्र नव्याने स्थापन झालेल्या सहा नगरपंचायतीमधील 102 सदस्य आणि मुदत संपलेल्या तीन नगरपरिपदामधील 51 सदस्य गृहीत धरल्यास जवळपास अपात्र सदस्यांची संख्या 156 पर्यंत जात आहे.त्यामुळे सोलापूर जिल्हा या निवडणूकीतून वगळण्यास हीच सदस्य संख्या कारणीभूत ठरल्याने जिल्ह्याला या निवडणुकीपासून वंचित रहावे लागले आहे.

जिल्ह्यातील 50 टक्के संस्थाचे कार्यकारी मंडळ कार्यरत नसल्याने निवडणूक लांबणीवर

जिल्ह्यातील पूर्वीच्या 11 नगरपालिका आणि नगरपरिषदांपैकी मोहोळ, माढा आणि करमाळा नगपरिषदेच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपलेली आहे.तर नव्याने स्थापन झालेल्या अकलूज, नातेपुते, महाळुंग श्रीपूर, वैराग आणि अनगर या नगरपंचायतीचे कार्यकारी मंडळ अद्याप कार्यरत नाही त्यामुळे जिल्ह्यातील 75 पेक्षा कमी संस्थाचे कार्यकारी मंडळ अस्तित्वात असल्याने अपात्र सदस्यांची संख्या 75 टक्केपेक्षा कमी होत असल्याने सोलापूरची निवडणूक लांबणीवर पडली असल्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी वर्तविली आहे.

Back to top button