व्रोस्लाव (पोलंड) : पुढारी ऑनलाईन
पोलंड येथील व्रोस्लावमध्ये सुरु असलेल्या आयएसएसएफ (ISSF) प्रेसिडेंट चषक स्पर्धेत भारतीय नेमबाज राही सरनोबतने ३१ गुण मिळवर रौप्यपदकाची कमाई केली आहे. २५ मीटर पिस्टल प्रकारात तिने ही चंदेरी कामगिरी केली. अवघ्या दोन गुणांनी राहीला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. पिस्तुलमध्ये बिघाड झाल्याने तिला हा फटका बसल्याचे समजते आहे. भारताच्या मनु भाकेरला अंतिम फेरीतील आठ स्पर्धकांमध्ये सहाव्या स्थानावर (१७ गुण) समाधान मानावे लागले.
स्पर्धेत जर्मनीच्या डोरीन वेन्नेकॅम्प हिने ३३ गुणासह सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर फ्रान्सच्या लॅमोले हिला ब्रांझ मेडलवर समाधान मानावे लागले. दरम्यान, भारताची स्टार नेमबाज राही सरनोबत पिस्तुलमध्ये बिघाड झाला. अशा परिस्थितीत तिचे दोन सिरीजमध्ये शॉट्स तो चुकले. हे होण्यापूर्वी राही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होती आणि तिने सलग तीन वेळा अचूक निशाणा साधला होता. पण शेवटच्या दोन सीरिजमध्ये पिस्तुलमधील बिघाडामुळे ती चांगली कामगिरी करू शकली नाही आणि सुवर्णपदकापासून वंचित राहिली.