राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार; कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर | पुढारी

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार; कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील 48 ते 72 तास पावसाचा मुक्काम राहणार आहे. प्रामुख्याने कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहील. 3 ऑक्टोबरपासून मात्र पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात आणखी दोन दिवस पाऊस राहणार आहे. 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आगामी 48 ते 72 तास राज्यातील बहुतांश भागात पाऊस राहील, मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर जास्त राहणार आहे. अरबी समुद्रात वा-यांचा वेग वाढला असून, तो 45 ते 55 कि. मी. वर गेल्याने पश्चिमी वा-यांचा जोर वाढला आहे.

पुणे शहरात मुसळधार

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 ते 72 तासांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहील. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Nashik News : नाशिक शहराला पावसाने झोडपले, चांदवडला वीज पडून महिलेचा मृत्यू

महाबिकट परिस्थितीत राज्यात नवे कर येण्याचे संकेत

कोल्हापूर-मुंबई मार्गावर 15 ऑक्टोबरपासून नियमित विमानसेवा

Back to top button