कोल्हापूर-मुंबई मार्गावर 15 ऑक्टोबरपासून नियमित विमानसेवा | पुढारी

कोल्हापूर-मुंबई मार्गावर 15 ऑक्टोबरपासून नियमित विमानसेवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-मुंबई मार्गावर दि.15 ऑक्टोबरपासून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. या नव्या विमानसेवेचे कंपनीने वेळापत्रक जाहीर केले असून, त्याचे बुकिंगही सुरू झाले आहे. मुंबईसाठी दैनदिन फ्लाईट उपलब्ध होण्याबरोबरच कोल्हापूर-बंगळूर मार्गावरही आठवड्यातून तीन दिवस दोन फ्लाईट उपलब्ध होणार आहेत.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर सध्या स्टार एअरची मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार अशी आठवड्यातून चार दिवस सेवा सुरू आहे. दि.15 पासून सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशीही मुंबईसाठी सेवा मिळणार आहे. या तीन दिवशी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी बंगळूरहून कोल्हापूरकडे विमान उड्डाण घेईल आणि 10 वाजून 20 मिनिटांनी हे विमान कोल्हापूरला येईल. त्यानंतर 10 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूरहून निघालेले विमान, मुंबईला 11 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.

मुंबईहून कोल्हापूरसाठी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल. कोल्हापुरात 4 वाजून 40 मिनिटांनी ते पोहोचणार आहे. सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी विमान बंगळूरला रवाना होईल. सध्या कोल्हापूर-बंगळूर मार्गावर दररोज फ्लाईट आहे. त्यामध्ये सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशीही आणखी एक फ्लाईट प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

Back to top button