Nana Patole News | पत्रकारांना ढाब्यावर बसवून सत्ता मिळणार नाही : नाना पटोले | पुढारी

Nana Patole News | पत्रकारांना ढाब्यावर बसवून सत्ता मिळणार नाही : नाना पटोले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  भाजप लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने काम करत आहे. अन्य पक्ष फोडून अनैतिक मार्गाने त्यांनी राज्याची सत्ता मिळवण्याचे पाप केले. आता पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे पाप झाकता येणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

दुसरीकडे, पत्रकारांना चिरीमिरी घेणारे समजता का? देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचे इमान विकणार नाहीत, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सकरून लगावला. पक्ष फोडून, सरकारी संस्थांचा धाक दाखवूनही आवाज दबत नसल्याने ते पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

Back to top button