नागपूर : पार्किंगचा वाद, एसआरपीएफ जवानाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू | पुढारी

नागपूर : पार्किंगचा वाद, एसआरपीएफ जवानाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा वाहन पार्क करताना झालेल्या वादात राज्य राखीव पोलिस दलाच्या एका जवानाने (५४ वर्षीय) व्यक्तीला मारहाण केली. या मारहाण झालेल्‍या व्यक्‍तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, वाठोडा पोलिस हद्दीतील माता मंदिर परिसरात जवानाचा कारच्या हेडलाइटवरून एकाशी वाद झाला. या वादात एका (५४ वर्षीय) व्यक्तीला संबंधीत जवानाने मारहाण केली. यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. संशयीत आरोपीचे नाव निखिल गुप्ता (वय ३०) असे आहे. तो त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी कारने या परिसरात आला होता.

गुप्ता आपली कार पार्क करीत असताना त्याच परिसरातील रहिवासी मुरलीधर रामरावजी नेवारे यांच्या चेहऱ्यावर कारच्या हेडलाइटचा प्रकाश पडला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पुढे दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी गुप्ताने नेवारे यांना जोरदार चापट मारली. त्यामुळे नेवारे जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. अखेर तक्रारीवरून पोलिसांनी गुप्ता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :  

Back to top button