पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील एका खासगी दवाखान्यात रविवारी (दि.२४) दोन नवजात बालकांचा मृत्यू झाला. डॉक्टरने त्या बालकांना वातानुकूलीत खोलीत ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित दवाखान्याचे मालक डॉ. नीतू यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
या बालकांना ज्या खोलीत ठेवण्यात आले होते तेथील एसी डॉक्टरांनी रात्रभर सुरू ठेवला होता, यामुळेच बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप नवजात बालकांच्या कुटुंबियांनी केला आहे. शनिवारी कैराना येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांचा जन्म झाला आणि नंतर त्याच दिवशी त्यांना खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. त्यांना उपचारासाठी फोटोथेरपी युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. डॉ. नीतू यांनी शनिवारी रात्री झोपण्यासाठी एसी सुरू केला, त्यानंतर रात्रभर एसी सुरूच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बालकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला गेले तेव्हा दोन्ही मुले युनिटमध्ये मृतावस्थेत आढळून आली, असे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा :