J&K Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या दिवशी चकमक सुरूच; २ दहशतवादी ठार | पुढारी

J&K Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या दिवशी चकमक सुरूच; २ दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या चार दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. बारामुल्ला येथे आज (दि.१६ सप्टेंबर) झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. याची जम्मू काश्मीर पोलिसांनी दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिली आहे. (J&K Encounter)

संबंधित बातम्या

एएनआयने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, बारामुल्ला जिल्ह्यातील उरी, हातलंगाया भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरू असून,या चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत. या भागात भारतीय जवानांकडून शोध मोहिम सुरू आहे, अशी माहिती J&K पोलीसांनी त्यांच्या ‘X’ च्या अधिकृत अकाऊंटवरून दिली आहे. (J&K Encounter)

भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात सुरू असलेल्या चकमकीत बुधवारी(दि.१३ सप्टेंबर) पहिल्या दिवशी १९ आरआर सीओ कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष ढोणक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट हे भारतीय जवान शहीद झाले. यानंतर जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी काल दुपारी पोलीस महासंचालक कोकरनाग येथे पोहोचले असून, खोऱ्यातील दहशतवादाचा नायनाट केला जाईल, असे म्हटले आहे.

बारामुल्ला जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर तसेच, त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याच्या एका दिवसानंतर ही चकमक घडली आहे. मीर साहिब बारामुल्ला येथील रहिवासी जैद हसन मल्ला आणि स्टेडियम कॉलनी बारामुल्ला येथील मोहम्मद आरिफ चन्ना अशी या दोन दहशतवाद्यांची ओळख पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे. (J&K Encounter)

हेही वाचा:

Back to top button