

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ट्रक एका दगडाला धडकून, खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत चार जण ठार झाले, तर ६ जनावरे दगावली. रामबन जिल्ह्यातील बनिहाल परिसरातील शेर बीबीजवळ मंगळवारी (दि.१२ सप्टेंबर) हा अपघात घडला. पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले, असे अधिकाऱ्याने सांगितले. (Jammu Kashmir)
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता. दरम्यान रस्त्यावरील एका मोठ्या दगडाला धडकून तो रस्त्यावरून घसरला. ट्रक खोल दरीत कोसळल्याने चारही प्रवासी जागीच ठार झाले, असेही त्यांनी सांगितले. ट्रकमधून नेत असलेल्या सहा जनावरांचाही या अपघातात मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे. (Jammu Kashmir)
किश्तवारी पाथेर बनिहाल येथे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे जम्मू-श्रीनगर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना NH-44 वर प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे देखील एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले आहे. (Jammu Kashmir)