रायगड : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे : सुरेश मगर | पुढारी

रायगड : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे : सुरेश मगर

रोहे; महादेव सरसंबे : राज्यभर मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे. आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावे, असे ओबीसी जनमोर्चाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांनी म्हटले आहे.

यावेळी सुरेश मगर म्हणाले की, ओबीसी समाज ५२ टक्क्यांच्यावर आहे. परंतू लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण मिळत नाही. ओबीसीमध्ये मराठा समाज समाविष्ट झाला तर आमचे आरक्षण कमी होईल. त्यामुळे आम्ही हा अन्याय कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्रात ओबीसी जनमोर्चाच्यावतीने ओबीसीमध्ये जनजागृती करुन मोठे आंदोलन करु. ओबीसींची जात निहाय जनजागृती करावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. ओबीसीची जातीनिहाय जनगणना केल्यास आमची संख्या कळेल, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा अध्यक्षा अक्षरा कदम, रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे, अनंता खराडे, मोरेश्वर खरीवले, चंद्रकांत भगत, अरविंद मगर, मुकेश भोकटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button