IMD update : राज्यातील या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी | पुढारी

IMD update : राज्यातील या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली होती. ऑगस्टमध्ये तो चांगला बरसेल, अशी अपेक्षा असताना संपूर्ण महिना कोरडाठाक गेला. आता सप्टेंबर महिन्यात तो हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरत आहे. गेल्या दोन दिवसात राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर  पालघर जिल्ह्यासाठी शनिवारी (दि.९) आणि रविवारी (दि१०) अनुक्रमे ‘यलो अलर्ट’  आणि ‘ग्रीन अलर्ट’  अलर्ट जारी केला आहे.

 शनिवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी पालघर जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी, काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या अंदाजासह येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर  मुंबईसाठी ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजासह ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ११ आणि १२ सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

हेही वाचा 

Back to top button