धुळे जिल्हा साक्री तालुका काँग्रेसची उद्या जनसंवाद पदयात्रा | पुढारी

धुळे जिल्हा साक्री तालुका काँग्रेसची उद्या जनसंवाद पदयात्रा

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

आदिवासी पश्चिम पट्ट्यातील कुडाशी येथून उद्या (दि.8) शुक्रवार सकाळी 6 वा गणपती मंदिर येथून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील व जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेला सुरुवात होणार आहे.

ही पदयात्रा साक्री तालुक्यातील कुडाशी गणपती मंदिर, काकशेवड, पाणखेडा, मल्याचापाडा, साईकृष्णा रिसॉर्ट पिंपळनेर या मार्गाने पिंपळनेर शहरात जाणार आहे.

पिंपळनेर येथे जाहीर सभा
जनसंवाद पदयात्रा दुपारी 1 वाजता साईकृष्णा रिसॉर्ट सटाणारोड, पिंपळनेर येथे पोहचणार असून यावेळी
प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होणार आहे. या पदयात्रेत तालुका काँग्रेस अध्यक्ष, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्ह्यातील महिला काँग्रेस, इंटक, सेवादल, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सेल अध्यक्ष, तालुक्यातील सर्व आघाडी, सेल अध्यक्ष, आजी-माजी आमदार, खासदार, जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, काँग्रेसचे ज्येष्ठ-श्रेष्ठ पदाधिकारी यांनी या जनसंवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यांनी केले आहे.

Back to top button