Maratha Andolan : अंतरवली सराटी घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन | पुढारी

Maratha Andolan : अंतरवली सराटी घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन

पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून पुण्यातील अलका चित्रगृहाजवळील टिळक चौकात पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन केले गेले. यावेळी मारहाण करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेली. आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

साईनाथ भाऊ बाबर मनसे शहराध्यक्ष प्रशांत कनोजिया, उपाध्यक्ष पुणे शहर रुपेश घोलप,  मनविसे राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य. किशोर चिंतामणी,  पुणे लोकसभा उपाध्यक्ष हेमंत धनगर, सुधीर खरात, पंकज जैन, ऍडमिन स्वामी, सतीश कोथळीकर, सतीश कोथळकर, हुसेन अब्बास, अली शेख, व मनसे वाहतूक सेना पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button