बीड: परळीत पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन; सकल मराठा समाजाचा एल्गार | पुढारी

बीड: परळीत पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन; सकल मराठा समाजाचा एल्गार

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : सध्या महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले आंदोलन, जालना जिल्ह्यात झालेला लाठीचार्ज व त्यानंतर या घटनेचे उमटलेले पडसाद या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू बनलेल्या परळीत पुन्हा एकदा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. आज (दि.२) सायंकाळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परळीच्या उपविभागीय कार्यालयासमोर शड्डू ठोकत ठिय्या आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. हे आंदोलन बेमुदत असणार असून यापूर्वी परळीत २१ दिवसांचे ऐतिहासिक आंदोलन करण्यात आले होते.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने १७ जुलै २०१८ पासून तब्बल २१ दिवस मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीवर परळी येथे आंदोलन झाले होते. या आंदोलनाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. मराठा आरक्षण आंदोलनातील ऐतिहासिक आंदोलन म्हणून याकडे पाहिले जाते. तब्बल २१ दिवस झालेले हे आंदोलन संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू बनले होते. त्याच मैदानावर परळीत पुन्हा एकदा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार सकल मराठा समाजाने पुकारला आहे. आता माघार नाही, अशा प्रकारचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा परळीत केंद्रित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button