बीड : मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या पिंपळनेर बंदची हाक | पुढारी

बीड : मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या पिंपळनेर बंदची हाक

बीड पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाचे आंदोलन उधळत आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या (दि.२) मराठा क्रांती मोर्चाने बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे

या बंदमध्ये पिंपळनेरकरांसह व्यापारी असोसिएशनचा पूर्णपणे पाठिंबा असून मी अध्यक्ष म्हणून या बंदला जाहीर पाठिंबा देत आहे. तरी सर्व मराठा समाज व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे आणि हे आंदोलन शांततेत होईल अशी सर्वांनी काळजी घ्यावी. सिद्धेश्वर तिळगुळ यांनी असे आवाहन केले आहे.

– सिद्धेश्वर तिळगुळ, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन पिंपळनेर तालुका जिल्हा बीड

हेही वाचा :

Back to top button