गणेशोत्सवात मंडपाचे भाडे आकारण्यात येऊ नये ; गणेशोत्सव मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी | पुढारी

गणेशोत्सवात मंडपाचे भाडे आकारण्यात येऊ नये ; गणेशोत्सव मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

मुंबई, पुढारी ऑनलाईन : सर्व महापालिका हद्दीत परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी. गणेशोत्सवात मंडपाचे भाडे आकारण्यात येऊ नये. गणेशोत्सव समितीच्या सदस्यांवर गणेशोत्सवात दाखल झालेले गुन्हे माफ करावे. विसर्जन घाटावर मोठी जागा उपलब्ध करावी अशा व इतर प्रमुख मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गणेशोत्सव मंडळांनी बुधवारी भेट घेऊन निवेदन सादर केले.

दरम्यान, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्त व मुंबई आयुक्त यांच्यासोबत सर्व संस्थाना घेऊन संयुक्त मिटिंग आयोजित करण्यात येईल व सर्व समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी मंडळांना दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.

ठाणे जिल्हा समन्वय संस्था, मुंबई गणेशोत्सव समिती, अखिल भारतीय सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र व कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्था यांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बुधवारी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात भेट घेऊन ठाणे जिल्हा, कल्याण व मुंबई उपनगर या विभागात गणेशोत्सादरम्यान भेडसावणाऱ्या समस्याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे,मुंबई सिद्धिविनायक मंदिरचे माजी संचालक व मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे,अखिल भारतीय उत्सव समिती महाराष्ट्र अध्यक्ष हितेश जाधव, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे अध्यक्ष समीर सावंत व कल्याण शहर गणेशोत्सव संस्थचे संदिप पंडित व तिन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

.हेही वाचा 

भारतीय कुस्‍ती महासंघाला मोठा धक्‍का, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे सदस्यत्व रद्द

Seema Deo : सीमा देव यांची रमेश देव यांच्याशी अशी झाली होती भेट, या क्षणी पडले प्रेमात

परभणी : गंगाखेड न.पा. नवे प्रशासक डॉ.जीवराज डापकर यांची नियुक्‍ती

Back to top button