Zika virus : मुंबईत झिका व्हायरसाचा पहिला रूग्ण आढळला | पुढारी

Zika virus : मुंबईत झिका व्हायरसाचा पहिला रूग्ण आढळला

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : चेंबूर येथील एम पश्चिम विभागात झिंका व्हायरसचा रूग्ण आढळून आला आहे. हा रग्ण ७९ वर्षीय पुरूष असून २ ऑगस्टरोजी बरा होऊन घरी परत गेला आहे, असे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

चेंबूर येथील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला १९ जुलै रोजी ताप, सर्दी आणि खोकला झाला होता. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, थॅलेसेमीया आदी मायनर आजार आहेत. त्यांना २० वर्षापूर्वी अँजिओप्लास्टीही करण्यात आलेली आहे. झिका आजार हा झिका व्हायरसमुळे होणारा सौम्य आजार आहे. हा आजार एडिस डासांमुळे पसरतो. हा आजार विषाणूजन्य आहे. मात्र, कोरोनासारखा वेगाने पसरत नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले.

हेही वाचा 

Back to top button