पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : उद्या रेल्वेच्या ‘या’ गाड्या रद्द | पुढारी

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : उद्या रेल्वेच्या 'या' गाड्या रद्द

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा-पुणे मार्गावरील चिंचवड-खडकी स्टेशनदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन अ‍ॅटोमेटिक सिग्नलिंगची कामे केली जाणार आहेत. यामुळे रविवारी (दि. 20) काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे-मुंबई-पुणे इंटरसिटी (गाडी क्रमांक 2127/12128), पुणे-मुंबई-पुणे डेक्कन (11007/11008), पुणे-मुंबई-पुणे प्रगती (12125/12126), मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना (11029/11030) एक्स्प्रेस रद्द राहील.

तसेच, पुणे-तळेगाव, पुणे-लोणावळा, शिवाजीनगर-तळेगाव, शिवाजीनगर-लोणावळा या सकाळच्या सत्रातील लोकल गाड्यासुध्दा रद्द राहणार आहेत. तसेच लोणावळा-शिवाजीनगर, तळेगाव-पुणे, लोणावळा-पुणे या लोकल गाड्यासुध्दा रद्द राहणार आहेत. त्यासोबतच काही एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल केला असून, त्या पुण्यातून विलंबाने धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

हेही वाचा

जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक 

‘कॅग’चा अहवाल गडकरींचा काटा काढण्यासाठीच

तलाठी पेपरफुटीमागे रॅकेट? पोलिसांचे पथक संभाजीनगरला रवाना

Back to top button