रायगड: चंद्रकांत कांबळे यांच्या खूनाच्या निषेधार्थ कोलाड – आंबेवाडीत बंद | पुढारी

रायगड: चंद्रकांत कांबळे यांच्या खूनाच्या निषेधार्थ कोलाड - आंबेवाडीत बंद

रोहा, पुढारी वृत्तसेवा: रोहा तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड – माणगाव दरम्यान असलेल्या तिसे गेट येथे गेटमेन चंद्रकांत कांबळे यांची सोमवारी (दि.२१) गोळी घालून अज्ञातांनी खून केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कोलाड- आंबेवाडी नाका आज (दि.२२) व्यापाऱ्यांनी बंद ठेवला.

यावेळी भाईसाहेब जाधव, सुरेश महाबळे, राजेश वाघमारे, यशवंत शिंदे, महेश रोकडे, विकास शिंदे, अनिल मोहीते, सुरेश गायकवाड, रमेश शिंदे, दीपक पवार, प्रकाश कांबळे, देवीदास जाधव, राकेश कांबळे, विजय जाधव, रविंद्र मोरे, अमोल वाटवे आदीसह महिला उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, पोलीस निरीक्षक अजित साबळे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तपासासाठी पोलिसांचे ८ पथके तैनात करण्यात आल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि कोकण रेल्वेचे कर्मचारी (गेटमेन) चंद्रकांत कांबळे ड्युटीवर असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण खून केला. तपासासाठी रायगड पोलिसांची आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, बीडीडीएस टीम, फिंगर एक्सपर्ट टीम व अन्य पथके आणि ९० पोलिस कर्मचारी तपास करीत आहेत. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button