रायगड: रोह्यातील लॉजविरोधात दमखाडी ग्रामस्थ आक्रमक | पुढारी

रायगड: रोह्यातील लॉजविरोधात दमखाडी ग्रामस्थ आक्रमक

रोहे, पुढारी वृत्तसेवा: रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दमखाडी नाक्यावरील लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर रोहा पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकून कारवाई केली होती. दरम्यान, या लॉजची सखोल चौकशी करून परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी दमखाडी ग्रामस्थांनी केली आहे.

भरवस्तीत असलेल्या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याने याचा तीव्र निषेध करण्यासाठी दमखाडी ग्रामस्थांनी आज (दि. २०) ११.३० वाजता नाक्यावर निदर्शने केली. यावेळी ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर महिला, ग्रामस्थांच्यावतीने पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, काशिनाथ धाटावकर, समाधान शिंदे, मनोहर धाटावकर, भूपेंद्र धाटावकर, विलास पालवणकर, अशोक धाटावकर, अशोक माने, गणेश बारणेकर, सुर्यकांत कोलाटकर, गिरीश घोसाळकर, सुधीर घोसाळकर, पांडुरंग धाटावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button