घराच्या भिंतींवर पिकवतात भाजीपाला | पुढारी

घराच्या भिंतींवर पिकवतात भाजीपाला

तेल अविव : जगभरात सध्या शेती करणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहेे. कारण, कुठे पाऊ स नाही, कुठे प्रचंड तापमान आणि कुठे शेतीयोग्य जमीन नाही. जगभरात अशी स्थिती असताना इस्रायल हा देश शेेती कशी करावी, याचा आदर्शच जगापुढे ठेवत आहे. या देशात व्हर्टिकल फार्मिंग अत्यंत प्रभावी ठरत आहे. तसेच ते आता जगभरातही लोकप्रिय ठरत आहे.

इस्रायलसारख्या देशात शेती करण्यायोग्य जमिनीचा प्रचंड अभाव आहे. यामुळेच या देशाने व्हर्टिकल फार्मिंगचा पर्याय निवडला. खासकरून शहरी भागात अशाप्रकारची शेती करण्यास या देशात प्राधान्य देण्यात येत आहे.

व्हर्टिकल फार्मिंगसाठी इस्रायलमध्ये चक्क घरांच्या भिंतींचा वापर करण्यात येत आहे. घराची सजवट आणि पीक असा दुहेरी लाभ या शेतीमधून मिळतो. काही लोक या शेतीच्या माध्यमातून आवडणारी भाजी, गहू, भात व दुसर्‍या काही प्रकारच्या भाज्या पिकवण्यावर भर देत आहेत.

व्हर्टिकल फार्मिंगमध्ये भिंतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्याची सोय केली जाते. यासाठी खास प्रकारच्या पाईप्सचा वापर केला जातो. यामध्ये लावण्यात येणार्‍या फळ अथवा भाजीच्या रोपांना पाणी देण्यासाठी ड्रॉप इरिगेशनचा वापर करण्यात येतो. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. ही संपूर्ण सिंचन व्यवस्था संगणकाच्या माध्यमातून नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच या झाडांचे रोपण जरा ती मोठी झाल्यानंतरच भिंतींवरील पाईपमध्ये केले जाते. उल्लेखनीय म्हणजे, व्हर्टिकल फार्मिंगमुळे इस्रायली लोक आपल्याच घरात आपण स्वत:ला आवडणारी भाजी पिकवू लागले आहेत. यामुळे घराचे तापमान नियंत्रित राहते आणि ऑक्सिजनही मिळण्यास मदत होते.

Back to top button