दापोली : कार अपघातात ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू | पुढारी

दापोली : कार अपघातात ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

दापोली; पुढारी वृतसेवा दापोली तालुक्यातील पिसई ते माटवण फाटा या दरम्यान मुंबईहून दाभोळकडे जाणाऱ्या कारचा झाडाला आदळून अपघात झाला आहे. हा अपघात आज (शनिवार) दि १२ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हाशम सारंग हे आपल्या कुटुंबासह मुंबई ते दाभोळ असे निघाले होते. दरम्यान त्यांच्या गाडीचा पिसई ते माटवण फाटा येथे अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास दापोली पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button